Photo : अजय देवगणची स्वप्नपूर्ती, थेट अमिताभ बच्चन यांचे दिग्दर्शन

‘मेडे (Mayday)’या चित्रपटासाठी हे दोघं एकत्र येणार आहेत. (Ajay Devgn’s dream come true, going to direct Amitabh Bachchan)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:25 PM, 7 Nov 2020
मेजर साहब, खाकी आणि सत्याग्रह यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर अमिताभ बच्चन आणि अजय देवगण दोघे परत एकत्र काम करणार आहेत.
जवळजवळ सात वर्षांनंतर हे दोघे सोबत काम करणार आहेत.
'मेडे (Mayday)'या चित्रपटासाठी हे दोघं एकत्र येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अभिनेता अजय देवगणच करणार आहे.
तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर अजय देवगणचं स्वप्न पूर्ण होणार असल्यातं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मेडे (Mayday)'या चित्रपटाचं चित्रीकरण येत्या डिसेंबर महिन्यात हैदराबादमध्ये सुरू होणार आहे.