PHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट

PHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

Ajit Pawar Birthday पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

पुण्यातील घरी काका शरद पवार, अजित पवारांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार या बर्थडे सेलिब्रेशनला हजर होते.

मुले पार्थ पवार आणि जय पवार यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, प्रतिभाताई पवार, आई आशाताई पवार, चुलते प्रतापराव पवार, भगिनी खासदार सुप्रिया सुळे, बंधू श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बर्थ डे पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आठ बहिणींनी मिळून अजित पवारांना वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फोटो

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फोटो

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फोटो

 

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फोटो

अजित पवार यांच्या वाढदिवसाचे फोटो

More Photo Gallery