Marathi News » Photo gallery » Andrew symonds death in car accident 5 lesser known facts about australian allrounder
Andrew Symonds Death: आई-बाप ठाऊक नाही, जिथे लहानाचा मोठा झाला त्यांच्याविरोधातच खेळला, शेवटचे 3 तास मृत्यूशी सुरु होती झुंज
Andrew Symonds Death: अँड्र्यू सायमंड्सचं करीयर आणि त्याचं आयुष्य खूपच इंटरेस्टिंग आहे. लहानपणापासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत क्रिकेटशिवाय अन्य गोष्टींमुळेही सायमंड्स नेहमी चर्चेत राहिला.
ऑस्ट्रेलियाचा माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew symonds) काल रात्री कार अपघातात (Car Accident) निधन झालं. क्वीन्सलँड राज्यातील टाउन्सविले येथे त्याच्या कारला अपघात झाला. सायमंड्स 46 वर्षांचा होता.
1 / 10
अँड्र्यू सायमंड्सचं करीयर आणि त्याचं आयुष्य खूपच इंटरेस्टिंग आहे. लहानपणापासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत क्रिकेटशिवाय अन्य गोष्टींमुळेही सायमंड्स नेहमी चर्चेत राहिला. सायमंड्सच्या आयुष्यातील पाच अशा गोष्टी जाणून घ्या, ज्याची चाहत्यांना कल्पना नसेल.
2 / 10
अँड्र्यू सायमंड्स मूळचा वेस्ट इंडिजचा होता. इंग्लंडमधील एका दांम्पत्याने त्याला दत्तक घेतलं होतं. सायमंड्सला ब्रिटनच नागरिकत्व मिळालं. पण तरुणपणी तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला. त्याच्याकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांचे पासपोर्ट् होते.
3 / 10
अँड्र्यू सायमंड्स क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडऐवजी ऑस्ट्रेलियाची निवड केली. 1995 साली सायमंड्सला इंग्लंडच्या ए संघात स्थान मिळालं होतं. पण त्याने खेळण्यास नकार दिला.
4 / 10
सायमंड्सची ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड संघात निवड झाली. त्याने इंग्लंड विरोधातच 108 धावांची खेळी केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं त्याचं हे पहिलं शतक होतं.
5 / 10
सायमंड्सच्या वयाच्या 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी डेब्यू केला. पण पुढची पाच वर्ष संघात तो आपलं स्थान पक्क करु शकला नाही. त्यानंतर सायमंड्सने क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता.
6 / 10
2002 मध्ये तो क्रिकेटकडून रग्बीच्या खेळाकडे वळला. ब्रिसबेन ब्रॉनकॉस या रग्बी संघासोबत त्याने सराव सुरु केला होता. 2009 मध्ये तो रग्बी सामनाही खेळला. पण त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटकडे वळला. 2011 पर्यंत क्रिकेट खेळला.
7 / 10
अँड्र्यू सायमंड्सला मासे पकडण्याची खूप आवड होती. ही आवड त्याच्यासाठी जीवावर सुद्धा बेतली होती. एकदा सायमंड्स मॅथ्यू हेडन आणि अन्य मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी समुद्रात गेला होता.
8 / 10
मासे पकडताना त्यांची नाव बुडाली. त्यावेळी तिघांना तीन तास स्विमिंग करुन किनारा गाठावा लागला होता. सायमंड्स आणि हेडन जिथे पोहत होते, तिथे शार्क माशांकडून हल्ला होण्याचा धोका होता.
9 / 10
सायमंड्सला लोक प्रेमाने रॉय बोलवायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटुंनी सायमंड्सला हे नाव दिलं होतं. सायमंड्सची चेहरेपट्टी बास्केटबॉल खेळाडू लेरॉय लॉजिंसशी मिळती-जुळती होती. लेरॉय ब्रिसबेनचा बास्केटबॉलपटू होता.