Photo : अनेक वर्षांची मैत्री, आयपीएलदरम्यान प्रपोज, या जोडीची खास लव्ह स्टोरी!

अ‍ॅरॉन फिंच ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. बॉल टेम्परिंग वादानंतर त्याने संघाचं चांगल्या प्रकारे कर्णधारपद सांभाळलं आहे. या प्रवासात त्याच्या पत्नीनेही त्याला मोलाची साथ दिली आहे. फिंचच्या पत्नीचे नाव अ‍ॅमी आहे. (Aaron Finch Amy Finch)

1/5
Australian Captain Aaron Finch And Amy Finch Love Story
अ‍ॅरॉन फिंच ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. बॉल टेम्परिंग वादानंतर त्याने संघाचं चांगल्या प्रकारे कर्णधारपद सांभाळलं आहे आणि 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीपर्यंतही त्याने संघाला नेलं होतं. या प्रवासात त्याच्या पत्नीनेही त्याला मोलाची साथ दिली आहे. फिंचच्या पत्नीचे नाव अ‍ॅमी आहे.
2/5
Australian Captain Aaron Finch And Amy Finch Love Story
अ‍ॅमी आणि फिंचचे 7 एप्रिल 2018 रोजी लग्न झाले होते. याच दिवशी आयपीएलला सुरुवात झाली आणि आयपीएलदिवशी दोघांमध्ये नव्या नात्याला सुरुवात झाली.
3/5
Australian Captain Aaron Finch And Amy Finch Love Story
पण लग्नाआधी दोघेही बराच काळ एकत्र होते. दोघांची खूप चांगली मैत्री होती. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, फिंचने आयपीएल दरम्यान अ‍ॅमीला परपोज केलं होतं. अ‍ॅमीने तिच्या इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टनुसार ती सामना पाहण्यासाठी भारतात आली होती. याचवेळी फिंचने तिला प्रपोज केले.
4/5
Australian Captain Aaron Finch And Amy Finch Love Story
लग्नाआधी त्यांची खूप चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघे खूप वर्ष एकमेकांना डेट करत होते.
5/5
Australian Captain Aaron Finch And Amy Finch Love Story
अॅमीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, तिने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया रेडिओ नेटवर्कसह नेटवर्क इंटिग्रेशन स्पेशलिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. तिच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तिला फिरायची खूप आवड आहे आणि तिला कुत्री पाळण्याचा देखील खूप छंद आहे.