
सफेद ब्रेड आणि मैदा असणारे वस्तू : मैद्याच्या वस्तू, उदा. व्हाईट ब्रेड बन, कुकीज, नानने खूप जास्त साखर तयार होते. मैद्यात फायबर नसते. त्यामुळे ही ब्लड शुगर वाढते. वारंवार हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरला नियंत्रित करण्यास जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हळूहळू डायबिटीजचा धोका वाढत जातो.

डीप-फ्राईड स्नॅक्स: समोसा, भजी, चिप्स हे आवडते स्नॅक्स आहेत. परंतू सातत्याने तळून तयार केलेल्या हे पदार्थ अनहेल्दी फॅटीने भरलेले असतात. ते हळूहळू शरीरात चरबी साठवतात. त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे इंसुलिन रेजिस्टेंन्स देखील वाढतो. आणि हाच टाईप - 2 डायबिटीजचे मोठे कारण असते. ट्रान्स फॅट असलेले पदार्थ ब्लड शुगर वाढवतात.

ग्रेनोला आणि हेल्दी सीरियल्स: ग्रेनोला आणि नाश्त्याचे सीरियल्स हेल्दी म्हणून विकले जातात. मात्र यात साखरेचे प्रमाण मोठे असते. अनेक ग्रेनोला बार, ओट बार आणि सिरियल्समध्ये एडेड शुगर इतकी असते की एका छोट्या सर्व्हींगने ब्लड शुगरवर जाते. वारंवार शुगर स्पाईक्सने शरीराचे इन्सुलिनवर अवलंबित्व वाढते. त्यामुळे सवय दीर्घकाळाने डायबिटीसचा धोका वाढवते.

प्रोसेस्ड मीट : सॉसेज, बेकन, सलामी सारखे प्रोसेस्ड मीट मध्ये सोडियम आणि नायट्रेट्स जास्त असते. हे केवळ हार्टसाठीच खराब असते असे नव्हे तर संशोधनानुसार याचा डायबिटीसशी थेट संबंध आहेत. प्रोसेस्ड मीट शरीरातील सूज वाढवते. आणि मेटाबॉलिझ्मला स्लो करते. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रण राखणे कठीण होते.

सोडा आणि शुगर ड्रिंक्स : कोल्ड ड्रिंक्स आणि पॅक्ड सोड्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. एका कॅन सोड्यात इतकी साखर असते. जी अनेक दिवसाच्या नॅचरल साखरेपेक्ष जास्त असते. त्यामुळे त्वरित साखर वाढते. पॅनक्रियाजवर सातत्याने दबाव वाढल्याने प्रत्येक गोड पेयाने शरीराला अतिरिक्त इन्सुलिन तयार करावे लागते. ज्यामुळे काळानुसार इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो.

पांढरा भात : भात हा भारतीय जेवणात महत्वाचा पदार्थ आहे. परंतू हा पदार्थ संपूर्णपणे रिफाईंड कार्बोहायड्रेट आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप जास्त असते. म्हणजे भाताने ग्लुकोज तयार होऊन थेट ब्लड शुगर वाढते. रोज जास्त प्रमाणात पांढरा भात खाल्याने वजन वाढते. आणि शुगर कंट्रोल बिघडते. त्यामुळे टाईप - 2 डायबिटीजचा धोका वाढतो.