PHOTO | ‘जुळून येती रेशीमगाठी’, शर्मिष्ठा राऊतची लग्नघटिका ठरली
जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे. (Bigg boss fame Sharmishtha raut Marriage date)
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Published On -
15:55 PM, 7 Oct 2020

-
-
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत येत्या 11 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार आहे.
-
-
तेजस देसाई असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. तो एका कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो.
-
-
“आपण सगळ्यांनी मला आणि तेजसला मनापासून स्वीकारलंत याबद्दल आम्ही दोघेही कायम तुमचे ऋणी आहोत. आता तुमच्या आणि वडीलजनांच्या आशीर्वादाने आम्ही 11.10.2020 रोजी लग्नाची गाठ बांधणार आहोत,” अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर टाकली आहे.
-
-
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई या दोघांचा जून महिन्यातच साखरपुडा पार पडला होता.
-
-
नाशिकमधील इगतपुरीतील एका रिसॉर्ट मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा पार पडला होता. याचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
-
-
शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्याशी झाले होते. मात्र काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
-
-
मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.
-
-
तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि.सौ.का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनयाने तिने छाप सोडली आहे.