Marathi News » Photo gallery » Chanakya Niti These things should never be shared even with a trusted person know more about there thoughts
Chanakya Niti | काहीही झालं तरी या गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करु नका,अन्यथा वाईट परिणामांसाठी तयार रहा
आपल्या मनातील गोष्टी दु:ख आपण इतरांना सांगतो. त्यामुळे आपले मन हलके होते. पण असे केल्यास तुम्ही संकटामध्ये येऊ शकता. आचार्य चाणक्य यांनीही अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आपल्या मनातील गोष्टी दु:ख आपण इतरांना सांगतो. त्यामुळे आपले मन हलके होते. पण असे केल्यास तुम्ही संकटामध्ये येऊ शकता. आचार्य चाणक्य यांनीही अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या कधीही खऱ्या मित्रासोबत शेअर करू नयेत. या गोष्टींमुळे तुम्हाला फक्त मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
1 / 5
जर तुमचे आर्थिक नुकसान होत असेल, पैशाची चणचण भासत असेल तर ही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या खास मित्राला ही गोष्ट सांगू नका. काही गोष्टी गुप्त ठेवण्यातच शहाणपण असते. जर बाहेरच्या लोकांना तुमची परिस्थिती कळली तर तुम्हाला मदत होणार नाही तर त्रासच होईल.
2 / 5
अनेकांना आपले दु:ख ठिकठिकाणी सांगून सांत्वन मिळवायची सवय असते. पण आचार्यांच्या मते आपले दु:ख कुणाला सांगू नये. आज ज्यांना तुम्ही तुमचे चांगले मित्र मानताय उद्या सकाळ ते तुमचे शत्रू असतील. तेव्हा हेच लोक तुमची चेष्टा करतील. त्यामुळ कोणालाही आपले दु:ख सांगताना विचार करा.
3 / 5
जर तुमच्या पत्नीच्या चारित्र्याशी किंवा तिच्या वाईटपणाशी संबंधित काही असेल तर ते स्वतःकडे ठेवणे शहाणपणाचे आहे. घरातील दु:ख, भांडण, भांडण वगैरे कुणाला सांगू नये. त्यामुळे भविष्यात तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. घरातील गोष्टी घरीमध्ये राहीलेल्याच चांगल्या असतात.
4 / 5
तुमचा अपमान झाला असेल तर ती गोष्ट तुमच्या आत ठेवा. त्या अपमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करू नका. जर प्रकरण बाहेर गेले तर त्याचा तुमच्या सन्मानावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. लोक तुम्हाल चुकीच्या पद्धतीने पाहू शकतात.