PHOTO : ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आता कशी दिसते?

सलमानसोबत धमाल करणारी मुन्नी आता मोठी झाली आहे. हर्षाली मल्होत्राला फोटोवरुन ओळखणं अवघड झालं आहे.('Bajrangi Bhaijaan's Munni Harshali Malhotra )

1/6
Harshali Malhotra
बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकार हर्षाली मल्होत्रानं दमदार अभिनयानं सगळ्यांचं मन जिंकलं होतं. सलमानसोबत धमाल करणारी हर्षाली आता मोठी झाली आहे. तिच्या फोटोवरुन तिला ओळखणं अवघड झालं आहे.
2/6
Harshali Malhotra
2015 मध्ये 'बजरंगी भाईजान'मध्ये झळकलेली हर्षाली सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते.
3/6
Harshali Malhotra
आता हर्षाली तिच्या एका डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘मुझे भरलो अपनी आखों में’ या गाण्यावर तिनं भन्नाट डान्स केला आहे.
4/6
Harshali Malhotra
हर्षाली सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर तिचा फॅनफॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे.
5/6
Harshali Malhotra
नुकतंच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं सांगितलं होतं की ‘सलमान खान यांनी मला असा सल्ला दिला आहे की तू लहान रोल करू नकोस… स्वत:ला चांगलं कॅरी कर आणि बॉलिवूडमध्ये डेब्यू कर’
6/6
Harshali Malhotra
तिच्या या इन्स्टाग्राम फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.