एकेकाळची टॉप हिरोईन ते मृत्यूनंतर तीन दिवस मृतदेह घरातच पडून, अभिनेत्री नलिनी जयवंत यांची करुण कहानी…

अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आज 96 जयंती आहे. त्यानिमित्त त्यांची जीवनकहानी जाणून घेऊयात...

Feb 18, 2022 | 8:10 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 18, 2022 | 8:10 AM

नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 मध्ये मुंबईत झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत कामाला सुरुवात केली. राधिका या चित्रपटात त्यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी काम केलं. मग हळूहळू त्या सिनेमाच्या 'हिरोईन' बनल्या आणि मग सुरू झालं नलिनी जयवंत नावाचं पर्व...

1 / 5
1940 ते 1950 या दशकात नलिनी जयवंत नावाचा सिनेसृष्टीवर दबदबा होता. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि कामाने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. 1959 साली आलेल्या 'काला पानी' चित्रपटाने नलिनी या नावाला ओळख दिली. या चित्रपटातील किशोरी या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला.

2 / 5
शेरू, मिस्टर एक्स, फिफ्टी-फिफ्टी, रेल्वे प्लॅटफॉर्म, लगन, नाज, नास्तिक, बाप बेटी, लकीरें, राही, कवि, सलोनी, नौ बहार, संग्राम, समाधी या सारखे अनेक सिनेमे नलिनी यांनी गाजवले. दिलीप कुमार, अशोक कुमार आणि देव आनंद या त्या काळच्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातले अनेक सिनेमे हिट ठरले.

3 / 5
1940 च्या दशकात नलिनी यांनी दिग्दर्शक विरेंद्र देसाई यांच्याशी लग्न केलं. याच काळात त्यांच्या आणि अभिनेते अशोक कुमार यांच्या प्रेम कहानीची जोरदार चर्चा होती. विरेंद्र यांच्याशी काडीमोड केल्यानंतर त्यांनी अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांनी प्रभू दयाल यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.

4 / 5
असा एककाळ मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा मृत्यू आणि त्यानंतर घडलेल्या घटना फार दुर्देवी आहेत. अखेरच्या दिवसात नलिनी यांच्या घरच्यांनीही त्यांची साथ सोडली. त्यांच्या मृत्यूनंतर तीन दिवस याबद्दल कुणालाही काहीही माहित नव्हतं. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुंबईतील चेंबुरच्या घरात 3 दिवस पडून होता. त्यांच्या नोकराने त्यांच्या निधनाची बातमी सांगितल्यानंतर अख्खं बॉलिवूड हदरलं होतं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें