Marathi News » Photo gallery » Cinema photos » Dharmaveer Marathi Movie released today before released eknath shinde prasad oak and mangesh desai did milk bath of anand shinde statue watch photos
Dharmaveer Marathi Movie: आनंद दिघेंच्या प्रतिकृतीवर दुग्धाभिषेक! पहिल्या शोआधी विवियानामध्ये जंगी कार्यक्रम
Dharmaveer Marathi Movie : धर्मवीर सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी पूजाअर्चा करण्यात आली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर सिनेमाच्या पहिल्या शो आधी ठाण्यात जंगी कार्यक्रम पार पडला. दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्या शो आधी विधीवत पूजा विवियाना मॉलच्या सिनेमागृहाबाहेर करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक, निर्माते मंगेश देसाई आणि संपूर्ण टीमही हजर होती.
1 / 5
पुजेसोबत ढोल ताशांच्या गजरात यावेळी उपस्थितांचा उत्साह वाढवण्यात आला. अनेक दिग्गजांनी या जंगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. धर्मवीर सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचा येत्या काळात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणंही महत्त्वाचंय.
2 / 5
आनंद दिघे यांची प्रतिकृती विवियाना मॉलमध्ये साकारण्यात आली होती. या प्रतिकृतीची विधिवत पूजा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. सकाळी होणाऱ्या पहिल्यावाहिल्या शो आधी ही पूजा आयोजित करण्यात आलेली.
3 / 5
मंगेश देसाई यांनी देखील प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच आनंद दिघे यांच्या प्रतिकृतीवर दुग्धाभिषेक केला. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मवीर या मराठी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात मंगेश देसाई, प्रसाद ओक आणि संपूर्ण टीम व्यस्त होती. अखेर आज हा सिनेमाच प्रदर्शित झालाय.
4 / 5
आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यानं आनंद दिघेंच्या प्रतिकृतीवर यावेळी दुग्धाभिषेक केला. अत्यंत उत्साहात यावेळी संपूर्ण टीम पहिल्या शोआधी एकत्र जमल्याचं पाहायला मिळाली. धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानपर्यंत अनेक दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून उपस्थिती लावली होती. स्वर्गीय आनंद दिघेंची कारकीर्द या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना नेत्यांकडून या चित्रपटाच्या शोचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.