PHOTO | जाणून घ्या आशियातील सोशल मीडियावरील टॉप 5 डिजिटल स्टार्स, एका भारतीय अभिनेत्याचाही समावेश

प्रतिष्ठित आणि आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स या मासिकाने आशिया खंडातील डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील एका दिग्गज अभिनेत्याला स्थान मिळाले आहे. (forbes list top stars)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:27 PM, 8 Dec 2020
1/6
तुम्हाला आशिया खंडातील टॉप 5 डिजिटल स्टार माहिती आहेत का? नसतील तर जाणून घ्या, आशिया खंडातील अशा टॉप पाच स्टार्सची नावं, जी सोशल मीडियावर तसेच डिजिटल मीडियावर सर्वांत प्रसिद्ध आहेत. प्रतिष्ठित आणि आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने आशिया खंडातील डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील एका दिग्गज अभिनेत्यालाही स्थान मिळाले आहे.
2/6
फोर्ब्सच्या यादीनुसार, आशियाई डिजिटल स्टार्समध्ये ब्लॅकपिंक बँड (blackpink band) पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियाच्या या बँडमध्ये लिज़ा, जेनी, रोज़, जिसू यांचा समावेश आहे. बँडचे सोशल मीडियावर कोटींनी फॉलोअर्स आहेत.
3/6
टॉप एशियन डिजिटल स्टार्सच्या यादीत जॅकसन यू दुसर्‍या क्रमांकावर आहे. जॅक्सन हा चीनचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. जॅक्सनचे weibo या सोशल वेबसाईटवर 8.60 कोटी फॉलोअर्स आहेत.
4/6
फोर्ब्सच्या यादीमध्ये थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री दाविका होर्ने तिसर्‍या क्रमांकावर आहे. दाविका थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.20 कोटी फॉलोअर्स आहेत.
5/6
चौथ्या क्रमांकावर भारताचे प्रसिद्ध अभिनेते तसेच, महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. अमिताभ बच्चन यांचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10.5 कोटी फॉलोअर्स आहेत.
6/6
फोर्ब्सच्या या यादीमध्ये व्हिएतनामची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ची पू पाचव्या स्थानावर आहे. ची पू व्हिएतनामची आहे. सोशल मीडियावर तिचे 1.9 कोटी फॉलोअर्स आहेत.