Photo : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरीचं खास मेकओव्हर, झळकणार मॉर्डन लूकमध्ये

गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पाहात आलोय. मात्र आता लवकरच ही गौरी मॉडर्न लूकमध्ये दिसणार आहे. (Gauri's special makeover in 'Sukh Mhnje Nakki Kay Asta' serial, to shine in a modern look)

1/5
Girija Prabhu
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पाहात आलोय. मात्र आता लवकरच ही गौरी मॉडर्न लूकमध्ये दिसणार आहे.
2/5
Girija Prabhu
जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधील गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर ‘परी म्हणू की अप्सरा’ ही एकच भावना आहे.
3/5
Girija Prabhu
या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.
4/5
Girija Prabhu
गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता.
5/5
Girija Prabhu
जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळवला सुद्धा मिळेल का हेच पाहण्यासारखं आहे.