LookAlike : ऐश्वर्या राय बच्चनच्या या चार हमशकल पाहिल्यात?, एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनसारखे दिसणारे चार व्यक्ती आहेत. (Have you seen Aishwarya Rai Bachchan's four Lookalike?, including a Marathi actress)

1/5
lookalike
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्यासाठी प्रत्येक जण वेडा आहे. तिनं आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसारखे दिसणारे काही लोक आहेत. मात्र मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनसारखे दिसणारे चार लोक आहेत. यांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. त्यांची फोटो पाहून चाहत्यांना खरी ऐश्वर्या राय बच्चन कोण हे ओळखणे कठीण होतं. ऐश्वर्या सारख्या दिसणाऱ्या मुलींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2/5
sneha min
सलमान खाननं स्नेहा उल्लालला 2005 साली ‘लकी’ या चित्रपटापासून लॉन्च केलं होतं. इंडस्ट्रीत येताच ती प्रसिद्ध झाली. ती पदार्पणामुळे नाही तर ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसते त्यामुळे. स्नेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता ती बॉलिवूड सोडून टॉलीवूडकडे वळली आहे.
3/5
aishwarya
पाकिस्तानी महिला आमना इम्रान बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती ऐश्वर्याच्या गाण्यांवर आणि डायलॉगवर व्हिडीओ बनवते.
4/5
aishwarya
इराणी मॉडेल महलाघा जाबेरी ही देखील ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसते. सौंदर्याच्या बाबतीत महालघाला ब्रेक नाही. महलाघा तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते, तिचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात. हजारो लोक सोशल मीडियावर तिला फॉलो करतात.
5/5
manasi naik
मानसी नाईक ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिला ऐश्वर्याची कार्बन कॉपी असं म्हटलं जातं. नुकतंच मानसीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी खऱ्या ऐश्वर्या कोण हे ओळखणं कठीण होतं. मानसी अभिनयासोबतच तिच्या नृत्यानं स्टेजवर धमाल करते. तिचे अनेक मराठी गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.