Photo : बॉलिवूडमध्ये ‘या’ अभिनेत्रींचा बोलबाला, सर्वाधिक फॉलोअर्समध्ये अभिनेत्यांना टाकलं मागे

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा पुरुष धमाल करायचे. आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानची सर्वत्र चर्चा असायची आणि ते सर्वात लोकप्रिय मानले जात होते. मात्र आता या महिलांनी चाहत्यांच्या बाबतीत बाजी मारली आहे. किमान इन्स्टाग्रामवर हेच चित्र आहे. (In Bollywood, actresses have surpassed actors in most followers Count)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:24 PM, 8 Mar 2021
1/5
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा पुरुष धमाल करायचे. आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानची सर्वत्र चर्चा असायची आणि ते सर्वात लोकप्रिय मानले जात होते. मात्र आता या महिलांनी चाहत्यांच्या बाबतीत बाजी मारली आहे. किमान इन्स्टाग्रामवर हेच चित्र आहे.
2/5
Priyanka Chopra, Photo
प्रियंका चोप्रा : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 60.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहेत. त्याच्या आधी फक्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे ज्यानं अलीकडेच 100 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.
3/5
Shraddha Kappor, Photo
श्रद्धा कपूर- शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर सर्वांनाच प्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 58.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे कोणत्याही बॉलिवूड खानपेक्षा खूपच जास्त आहेत. या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रत्येकाची मनं जिंकली आहेत.
4/5
Deepika Padukone
दीपिका पदुकोण - माजी बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी दीपिका पदुकोणने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टिरिओटाइप ब्रेक केले आहेत. आज ती चित्रपटासाठी एखाद्या पुरुष अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे आकारते. तिनं इंडस्ट्रीत महिलांच्या भूमिकेची नव्यानं व्याख्या केली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 53.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
5/5
Neha Kakkar, Photo
नेहा कक्कर - नेहा कक्करनं तिच्या क्यूटनेसमुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि आवाजानं लोकांची मनं जिंकली आहेत. बर्‍याच संघर्षानंतर तिला हे स्थान मिळालं असून आता चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सविषयी बोलायचं झालं तर तिचे 52.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.