साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन

एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'RRR' लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.

Mar 20, 2022 | 4:39 PM
स्वाती वेमूल

|

1 / 5
येत्या 25 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी रविवारी (20 मार्च) सकाळी या चित्रपटाची टीम गुजरातला रवाना झाली. राजामौली, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या तिघांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.

2 / 5
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे प्रमोशन करणारा RRR हा पहिला चित्रपट आहे. यावेळी रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हस्तांदोलन करत फोटो काढले.

3 / 5
रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे. तर, ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे.

4 / 5
दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवला जात आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें