Photo : ‘लेडी बॉस’, रुपाली भोसलेचा क्लासी अवतार

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ( 'Lady Boss', a classic look of Rupali Bhosale)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:38 AM, 1 Apr 2021
1/5
Rupali Bhosale
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा ती खुबीने निभावत आहेत.
2/5
Rupali Bhosale
गेल्या वर्षीच रुपालीने आपल्या रिलेशनशीपची जाहीर वाच्यता केली. रुपाली आणि तिचा बॉयफ्रेण्ड अंकित मगरे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. एवढंच नाही तर लग्नाची तयारी देखील सुरू झाली आहे.
3/5
Rupali Bhosale
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.
4/5
Rupali Bhosale
रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.
5/5
Rupali Bhosale
मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिनं अंकित मगरेच्या प्रेमात असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. एवढंच नाही तर अनेक फोटोसुद्धा पोस्ट केले होते. आता रुपालीचा हा बॉस लेडी अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.