1/7

आता झी मराठी या वाहिनीवरील जुन्या मालिका संपताना दिसत आहेत. त्यासोबतच नवीन मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
2/7

आता परत झी मराठी वाहिनीने एक मोठा बदल केला असून चक्क मालिकेच्या नावासहित अभिनेत्री देखील बदलण्यात आली आहे.
3/7

अग्ग बाई सासूबाई या मालिकेत अनेक बदल दिसून येत आहेत. यासोबतच आता मालिकेचं नाव बदलून ‘अग बाई सूनबाई’ असं करण्यात आलं आहे. मोठ्या वेळेनंतर कुलकर्णी घरात बदल दिसून येत आहेत. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता ऑफिस हातात घेतलं आहे.
4/7

आसावरीसोबत तिचा सोहम आता उजवा हात म्हणून काम बघतोय. तसेच अभिजित राजेंनी त्यांच्या स्टाइलनं स्व खुशीनं घर सांभाळायला घेतलं आहे.
5/7

शुभ्रानं सगळं स्वीकारुन आसावरीच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे.
6/7

त्यात तेजस्विनी प्रधानच्या जागेवर नवी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. उमा हृषिकेश पेंढरकर असं या नव्या अभिनेत्रीचं नाव आहे.
7/7

बबड्या कोण असणार हे अद्याप कळलं नसलं तरी, या भूमिकेत अद्वैत दादरकर किंवा अभिजित खांडकेकर दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.