न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री, ‘रंग माझा वेगळा’ फेम निकिताची दिलखेचक अदा

न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री असा अमृता बनेचा प्रवास आहे. (Rang Maza Vegla Nikita Amruta Bane)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:57 PM, 26 Feb 2021
1/8
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
2/8
रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार अशी विविध पात्र घराघरात लोकप्रिय ठरली आहेत.
3/8
या मालिकेत निकिताची भूमिका साकारणारी अमृता बने खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते.
4/8
न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री असा अमृता बनेचा प्रवास आहे.
5/8
सौंदर्या इनामदार यांची सेक्रेटरी निकिताच्या भूमिकेत अमृता दिसत आहे.
6/8
यापूर्वी तिने 'जय जय स्वामी समर्थ' मधील राणी देवयानीचीही भूमिका साकारली होती.
7/8
'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेतील सरस्वतीच्या भूमिकेतून तिने अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
8/8
अमृताच्या फोटोंना सध्या सोशल मिडियावर चांगली पसंती आहे.