Photo : संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलियाचा कडक लूक!

गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्टला (Alia Bhatt) पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहेत. (24 फेब्रुवारी) ‘गंगूबाई काठियावाडी‘ चित्रपटाचा टीझर (Gangubai Kathiawadi Teaser) प्रदर्शित झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:22 AM, 25 Feb 2021
1/5
alia bhatt 1
‘गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्टला (Alia Bhatt) पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहेत. (24 फेब्रुवारी) ‘गंगूबाई काठियावाडी‘ चित्रपटाचा टीझर (Gangubai Kathiawadi Teaser) प्रदर्शित झाला आहे. या टीझर प्रदर्शनासाठी खास दिवस निवडला गेला होता, कारण 24 फेब्रुवारी हा चित्रपटाचे निर्माता संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस होता.
2/5
alia bhatt 2
या पार्टीत आलिया भट्टही पोहोचली होती, जिथे तिने मीडियाला पोज दिला आणि 'गंगूबाई काठियावाडी' च्या शैलीत पोज देत सर्वांना अभिवादन केले. आलियासोबत यावेळी संजय लीला भन्साळी देखील होते.
3/5
alia bhatt 3
संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री पोहचले होते.
4/5
alia bhatt 4
गंगूबाई काठियावाडी ही मुंबईची एक चर्चित माफिया होती, तिला तिच्या पतीने अवघ्या 500 रुपयात विकले होते. या सिनेमात गंगूबाईच्या जीवनातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अगदी लहान वयात तिचे कसे एका मोठ्या माणसासोबत लग्न लावून दिले गेले आणि या माणसाने कशा प्रकारे तिचा सौदा केला, या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरणार आहे.
5/5
alia bhatt 5
‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेस्सी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.