Photo: जीवनात ही घडी अशीच राहू दे… श्रद्धा कपूरचा कूल अंदाज

बॉलिवूडची चुलबुली आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. (Shraddha Kapoor's maldives vacation )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:36 PM, 8 Apr 2021
1/5
Shraddha Kapoor
बॉलिवूडची चुलबुली आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आजकाल चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त झाली आहे. अलीकडेच तिच्या आगामी ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटामुळे नाही तर, श्रद्धा कपूर आता तिच्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
2/5
Shraddha Kapoor
सध्या श्रद्धा मालदीवमध्ये धमाल करतेय. मालदीवचे नवनवीन फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3/5
Shraddha Kapoor
या फोटोंमध्ये ती मालदीवमध्ये धमाल करताना दिसतेय.
4/5
Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर लवकरच ‘चालबाज इन लंडन’मध्ये दुहेरी भूमिका करताना दिसणार आहे. श्रद्धा ही पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार आहे. अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टच्या घोषणेनंतर तिचे चाहते बरेच उत्सुक झाले आहेत. याशिवाय ती निखिल द्विवेदीच्या ‘नागीन’ चित्रपटात एका इच्छाधारी नागीणच्या भूमिकेतही दिसणार आहे .
5/5
Shraddha Kapoor
लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘हॅलो चार्ली’ (Hello Charlie) हा साहसी कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा आणि गोरिलाचा हा व्हिडीओ देखील या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे दिसते आहे. कारण, या चित्रपटात टोटो गोरिला आणि सरळ साधा चार्ली (आदर जैन) यांची गंमत पाहायला मिळणार आहे.