PHOTO | रबर बँडची अंगठी, उधार घेतलेली साडी, अवघ्या 150 रुपयांत पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्याचं लग्न!

अलीकडेच विरफ पटेल आणि सलोनी खन्ना (Saloni Khanna) लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. या दोघांनीही अनोख्या पद्धतीने लग्न केले आहे. अवघ्या दीडशे रुपयात या जोडीचं लग्न पार पडलं.

1/6
कोरोनाच्या संसर्गामुळे आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अस्ताव्यस्त झाले आहे. कोरोनामुळे राज्याने लॉकडाऊन जाहीर करत, लग्न वगैरे समारंभासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत, बर्‍याच कलाकारांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे.
2/6
मात्र, ‘नामकरण’ फेम अभिनेता विरफ पटेल (Viraf Patel) यांने त्याच्या लग्नसोहळ्याने समाजापुढे एक आदर्शाचं उदाहरणं दिलं आहे. अलीकडेच विरफ पटेल आणि सलोनी खन्ना (Saloni Khanna) लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. या दोघांनीही अनोख्या पद्धतीने लग्न केले आहे. अवघ्या दीडशे रुपयात या जोडीचं लग्न पार पडलं.
3/6
विरफ आणि सलोनी यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. या दोघांचे लग्न मुंबईच्या वांद्रे कोर्टात झाले. कोर्ट मॅरेजमध्येही दोघांनी फक्त साधेपणाने सोहळा केला. मॅरेज रजिस्ट्रारचे 100 रुपये आणि फोटोचे 50 रुपये इतकाच खर्च या लग्नाला आला आहे. तर, सलोनीनेही फोटो पोस्ट करत मेजेशीर कॅप्शन दिलं आहे. ‘रबर बँडची अंगठी, उधारीची साडी, अँटीबॉडी असणारे साक्षीदार आणि केवळ 150 रुपये! असा पार पडला आमचा लग्नसोहळा’, असे तिने म्हटले आहे.
4/6
विरफ आणि सलोनी यांनी आपल्या लग्नासाठी जमा केलेली रक्कम कोरोना पेशंट्सना दान केली. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
5/6
आपल्या लग्नाविषयी सांगताना अभिनेता म्हणतो की, लग्नासाठी त्याच्याकडे अंगठीही नव्हती, म्हणून रबर बँड वापरला. लग्नाचा सोहळा किती मोठा आहे या पेक्षा नात किती मजबूत आहे हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे विवाह केल्याबद्दल चाहते दोघांचेही कौतुक करत आहेत आणि दोघांचेही जोरदार अभिनंदन करत आहेत.
6/6
मी तुम्हाला सांगतो की अभिनेता विराफ पटेल आणि सलोनी खन्ना यांच्या प्रेमकथेबद्दल बोलताना दोघांची दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन कार्यक्रमात भेट झाली होती. यानंतर हे दोघेही मित्र बनतात आणि तेव्हापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.