PHOTO : कोरोना विरोधातील लढाईत आरएसएसही अग्रभागी, स्शमानभूमी स्वच्छता ते मोफत जेवण, परिचारिकांचे पाय धुवून सन्मान

कोरोना विरोधातील लढाईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही अग्रभागी आहेत. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या सेवेत त्यांनी स्वत:ला वाहून घेतल्याचं पाहायला मिळतं.

1/6
कोरोनाविरोधातील लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस कार्यकर्तेही अग्रभागी आहेत. मध्य प्रदेशातील भिंडमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आरएसएसचे कार्यकर्ते कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर स्मशानभूमीतील साफसफाई करतानाही संघाचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत.
2/6
भिंडमध्ये संघाचे स्वयंसेवक मनीष ओझा यांच्या म्हणण्यानुसार आरएसएसचे कार्यकर्ते कोरोना रुग्णांचीही सातत्याने सेवा करत आहेत. त्यात गरीबांना मोफत जेवण, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप, औषधे उपलब्ध करुन देण्याचं काम केलं जात आहे.
3/6
भिंड आणि परिसरातील स्मशानात कोरोना रुग्णांच्या मृतदेहांमुळे फक्त संसर्गाचा धोका नाही तर स्मशानभूमीचा परिसरात मोठ्या प्रमाणात घाणही जमा झाली आहे. अशावेळी स्माशनभूमीच्या साफसफाईची जबाबदारी संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय. आरएसएसची एक टीम स्मशानभूमीची रोज साफसफाई करते.
4/6
जागतिक परिचारिका दिनी संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांचे पाय धुवून त्यांना सन्मानित केलं. मनीष ओझा यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानित करुन आरएसएस हा संदेश देऊ पाहत आहे की, त्यांचा हा त्याग आणि बलिदान कायम लक्षात राहील.
5/6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना असलेल्या सेवाभारतीशी जोडले गेलेले लोकही कोरोना संक्रमित लोकांच्या परिवारांची मदत करत आहेत. सेवा भारतीद्वारे एक हेल्पडेस्क बनवण्यात आलाय. त्याद्वारे रुग्णालय, बेड, ऑक्सिजन आणि औषधांशी निगडीत समस्या सोडवण्याचं काम केलं जातं. या हेल्प डेस्कद्वारे स्वयंसेवक दररोज रुग्णांच्या परिवाराला मोफत जेवण देण्याचं काम करतात.
6/6
त्याचबरोबर पोलीस कर्मचारीही जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यांनाही मोफत जेवण, मास्क आणि सॅनिटायझर यांसारख्या वस्तू पुरवण्याचं काम केलं जात आहे. आरएसएसचे कार्यकर्ते रक्त आमि प्लाझ्मा दान करण्यासाठी एक नेटवर्क बनवून गरजूंची मदत करत आहेत. आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयात रक्तदान केलं आहे.