Deepika padukone at cannes 2022 : ज्युरी टेबल आणि दीपिकाचा सब्यसाचीचा पोशाखात खुलणारे तिचे रूप; पहा व्हायरल फोटो

आज 17 मेपासून कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. या वर्षी व्हिन्सेंट लिंडन यांना ज्युरीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तसेच भारतातून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही ज्युरीमध्ये सामील सामील झाली होती. तर यावेळी तिचा आणखीन एक आगळावेगळा लूक समोर आला. ज्यात तिने सब्यसाचीचा पोशाख परिधान केला आहे. ज्यामुळे तिचे सौदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

May 17, 2022 | 11:14 PM
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 17, 2022 | 11:14 PM

 यावेळी दीपिका कान्सच्या सर्व दिवसांमध्ये रेड कार्पेटची शान वाढवताना दिसत असून ती आपल्यासोबत असणाऱ्या इतर ज्युरी आणि फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या चाहत्यांसोबत आनंद लूटताना दिसत आहे. तर त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहे.

1 / 9
आज 17 मेपासून कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. या वर्षी व्हिन्सेंट लिंडन यांना ज्युरीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

2 / 9
दीपिकाशिवाय ब्रिटीश स्टार रेबेका हॉल, नॉर्वेजियन चित्रपट निर्माते जोआकिम ट्रियर, अमेरिकन दिग्दर्शक जेफ निकोल्स, स्वीडिश स्टार नूमी रॅपस, इराणी दिग्दर्शक असगर फरहादी, इटालियन दिग्दर्शक आणि अभिनेत्री जॅस्मिन ट्रिंका आणि फ्रेंच चित्रपट निर्माते लेजेस या वर्षी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. लाडज ली यांना ज्युरी सदस्य बनवण्यात आले आहे.

3 / 9
काही दिवसांपूर्वीच कान्स फिल्म फेस्टिव्हलने ज्युरी सदस्यांची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये दीपिका पदुकोणच्या नावाचाही समावेश आहे. ही आनंदाची बातमी खुद्द दीपिकाने तिच्या चाहत्यांना दिली.

4 / 9
स्टायलिस्ट शालिना नंथानीने दीपिकाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी दीपिका पदुकोणने भारतीय डिझायनर परिधान करणे निवडले आहे. दीपिका पदुकोण सब्यसाचीच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

5 / 9
ज्युरीमध्ये दीपिकाचा लूक वेगळा आणि सुंदर दिसत आहे. तिच्या केसांना रेट्रो लुक देत तिने त्यावर स्कार्फ बांधला. हा तिच्या लुकच्या सौंदर्यात भर घालत आहे.

6 / 9
लुकबद्दल बोलायचे झाले तर दीपिकाने लाइट ग्रीन कलरची पँट घातली आहे. यासोबत ऑफ व्हाइट प्रिंटेड शर्ट कॅरी केला आहे. केस बांधले आहेत आणि त्यावर स्कार्फ गुंडाळला आहे. तपकिरी चामड्याचा पट्टा विंच केलेले घड्याळ हातात बांधलेले आहे.

7 / 9
विशेष बाब म्हणजे दीपीकाने आपल्या या चकित करणाऱ्या लुटचे फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. तिच्या सोबत हे फोटो शलीना ननथानी ने ही दीपीकाच्या लुकचे फोटो शेअर केले आहेत. तर यावेळी तिने घातलेला गळ्यातील हार तिचे सौदर्य अधिकच खुलवत आहे.

8 / 9
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून या लुकमुळे तिचे चाहते घायाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिने शेअर केलेल्या फोटोंना हजारोंचे लाईक ही मिळत आहेत.

9 / 9

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें