कोल्हापुरात पुन्हा महाडिक पर्व सुरु! राज्यसभेतील विजयानंतर धनंजय महाडिकांचं जंगी स्वागत, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांचा गजर

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचंय ढोल-ताशाच्या गजरात आणि गुलालाची प्रचंड उधळण करत स्वागत केलं.

Jun 12, 2022 | 4:38 PM
भूषण पाटील

| Edited By: सागर जोशी

Jun 12, 2022 | 4:38 PM

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रंगलेल्या लढतीत अखेर भाजपच्या धनंजय मुंडे मुंडे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे कोल्हापूरचेच उमेदवार संजय पवार यांचा पराभव केलाय.

1 / 6
या विजयानंतर कोल्हापुरात महाडिकांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. 11 जूनला पहाटे राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच कोल्हापुरात जल्लोषाला सुरुवात झाली.

2 / 6
विजय मिळवल्यानंतर धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

3 / 6
ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांचं स्वागत केलं.

4 / 6
त्यावेळी धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांना खांद्यावर घेऊन समर्थकांनी गाण्यावर ठेका धरला.

5 / 6
महाडिक यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बऱ्याच कालावधीनंतर महाडिक कुटुंबात विजयोत्सव साजरा होत असल्यानं कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिक पर्व सुरु झाल्याची चर्चा समर्थकांमध्ये रंगली आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें