PHOTO | ‘भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा..’, पाहा धनश्रीच्या ‘डोहाळे जेवणाचे’ खास फोटो!

धनश्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:30 PM, 23 Nov 2020
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे.
काही दिवसांपूर्वी धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
या गोड बातमीनंतर धनश्रीने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती ‘बेबी बंप’सह छान पोझ देताना दिसली होती.
आता धनश्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
छान नक्षीदार जरीची साडी नेसलेली धनश्री खुपच मनमोहक दिसतेय. खास करुन यशोदा माता आणि बाळकृष्णाचा फोटो असलेला तिचा ब्लाऊज लक्ष सगळ्यांचे वेधून घेतोय.
फुलांच्या आभूषणामुळे धनश्रीचे सौंदर्य खुलले आहे. पती ध्रुवेश देशमुखसोबतचा धनश्रीचा हा फोटो खुपच गोड दिसतोय.