Business News : करोडपती होण्यासाठी धमाकेदार आयडिया, दिवसाला फक्त 30 रुपये करा खर्च

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:08 PM, 4 Mar 2021
1/11
नोकरी असो किंवा बिझनेस असो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत होण्याची इच्छा असते. काही लोक अथक प्रयत्नांनी पैसा कमवतातही तर काही लोक गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवतात.
2/11
आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल.
3/11
आता तसं पाहायला गेलं तर करोडपती (Crorepati) होण्याचा कुठलाही शॉर्टकट नाहीये. हो पण तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक (Systematic Investment) केली तर मात्र तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता.
4/11
तरुण वयात कसे व्हाल करोडपती ? (How to become crorepati) - गुंतवणुकीतून उत्तम पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच गुंतवणूक करायला पाहिजे. जर तुम्ही 20 वर्षांचे असाल तर दररोज फक्त 30 रुपये साठवून साठव्या वर्षी तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
5/11
दिवसाला 30 रुपये ठेव म्हणजे महिन्यात 900 रुपये. दरमहा SIP (Systematic Investment Plan) मध्ये तुम्ही 900 रुपये गुंतवा. जर तुम्ही 40 वर्षांसाठी दरमहा फक्त 900 रुपयांची एसआयपी केली तर ही रक्कम कोटींमध्ये असणार आहे.
6/11
– यासाठी तुम्ही दिवसाला 30 रुपये आणि महिन्यात 900 रुपये बचत करा. ही बचत एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा. एका वर्षात ही गुंतवणूक 10,800 रुपये होईल. 40 वर्षांत ही गुंतवणूक 4,32,000 रुपये होईल.
7/11
म्युच्युअल फंडांला 12.5 टक्के दराने परतावा मिळतो. 12.5 टक्क्यांच्या परताव्यासह 40 वर्षानंतर ही रक्कम खूप मोठी असू शकते.
8/11
PF new Rules
PF new Rules
9/11
एचडीएफसी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 33 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर 2 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक व्याजदर 6.20 टक्के असेल. त्याचबरोबर मुदत ठेवींवर 66 महिन्यांसाठी 6.60 टक्के व्याज दिले जाईल. एचडीएफसीच्या मते, 99 महिन्यांच्या मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर 6.65 टक्के ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रचलित दरावर 25 बीपीएस जादा व्याज मिळेल.
10/11
gratuity transfer if the company changes
gratuity transfer if the company changes
11/11
गृह कर्ज देणारी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) ने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली. नवीन व्याजदर 30 मार्चपासून लागू झालेत. एचडीएफसी लिमिटेड बँका मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करत असताना असा निर्णय घेतला.