Marathi News » Photo gallery » Gold Hallmarking mandatory from today but what happens to your old jwellery know all details
PHOTO: हॉलमार्किंग नसलेल्या तुमच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar
Updated on: Jun 16, 2021 | 10:23 AM
Gold hallmarking | केंद्र सरकारच्या आदेशानुसार 16 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
वास्तविक सोने ओळखण्यासाठी आपण चुंबक चाचणी देखील करू शकता. सोने चुंबकाला चिकटत नाही, म्हणून एक मजबूत चुंबक घ्या आणि त्याने सोने चिकटवा. जर सोने किंचितही चुंबकाकडे आकर्षित झाले तर याचा अर्थ असा आहे की सोन्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. म्हणूनच, चुंबकासह तपासणी केल्यावरच सोने खरेदी करा.
सोने तारण कर्ज
त्यामुळे आता आपल्या जुन्या दागिन्यांना (Gold) किंमत उरणार नाही का, या भीतीने अनेकजण धास्तावले आहेत. मात्र, या नियमामुळे लोकांनी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण केंद्र सरकारने सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे.
जळगावात सोन्याच्या दरात घसरण
सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी!
हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या जुन्या दागिन्यांचे तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर दागिन्यांचे हॉलमार्क करता येईल. पण जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हॉलमार्किंग नसणारे दागिने विकल्यास तुम्हाला कमी पैसे मिळतील.
सोन्याचा दर
BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे.
भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.