या देशात रुळावर नाही तर रुळाला लटकून चालते ट्रेन, रेल्वेची वैशिष्ट्ये नेमकी काय?

रुळांवरून चालणारी ट्रेन तुम्ही पाहिली असेलच, जमिनीवर, पुलांवर किंवा अगदी जमिनीखाली. सामान्य गाड्या असो की मेट्रो ट्रेन.. त्या फक्त रुळांवर धावतात. पण तुम्ही कधी रुळांच्या खाली लटकलेल्या गाड्या पाहिल्या आहेत का?

1/5
रुळांवरून चालणारी ट्रेन तुम्ही पाहिली असेलच, जमिनीवर, पुलांवर किंवा अगदी जमिनीखाली. सामान्य गाड्या असो की मेट्रो ट्रेन.. त्या फक्त रुळांवर धावतात. पण तुम्ही कधी रुळांच्या खाली लटकलेल्या गाड्या पाहिल्या आहेत का? आपल्यापैकी काहींनी त्यात प्रवासही केला असेल, परंतु बहुतेक लोकांसाठी हे आश्चर्य आहे. या ट्रेनला हँगिंग ट्रेन असं म्हणतात.

2/5
हँगिंग ट्रेन म्हणजे लटकणारी ट्रेन... ही ट्रेन भारतात नसून जर्मनीत आहे. या गाड्या रुळावरुन धावत नाहीत. या गाड्या जर्मनीमध्ये वुपरटल सस्पेंशन रेल्वे अंतर्गत चालतात. या गाड्या रोपवेप्रमाणे धावतात. या गाड्यांमधला प्रवास रोमांचकारी असतो. ही ट्रेन दररोज 13.3 किमी प्रवास करते. त्याच्या मार्गावर 20 स्थानके आहेत.

3/5
लटकणारी ट्रेन कशी चालते?..... उलट्या पद्धतीने चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवासीही उलटाच प्रवास करत असतील, असा विचार  करु नका. रेल्वे रुळांवर लटकून धावत असली तरी नेहमीच्या गाड्यांमध्ये लोकांना बसण्यासाठी अशीच व्यवस्था असते. म्हणजेच त्यात आरामात बसून लोक प्रवास करतात. ही इलेक्ट्रिक ट्रेन जमिनीपासून 39 मीटर उंचीवर धावते.

4/5
 या रिव्हर्स ट्रेनबद्दल ज्याला पहिल्यांदाच कळते, त्यांना आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. ही ट्रेन सुमारे 120 वर्षांपूर्वी 1901 मध्ये सुरू झाली होती. जगातील सर्वात जुन्या मोनोरेलमध्ये तिची गणना होते, असे सांगितले जाते. जर्मनीला जाणाऱ्या पर्यटकांनी या ट्रेनमधून एकदा प्रवासाचा आनंद नक्कीच घ्यावा.

5/5
ही सस्पेंशन मोनोरेल जर्मनीतील वुपरटल शहरात सुरू करण्यात आली. जगातील सर्वात जुन्या हँगिंग कार इलेक्ट्रिक एलिव्हेटेड रेल्वेखाली धावणाऱ्या ट्रेनचा प्रवास हा बाकीच्या ट्रेन्सपेक्षा वेगळा आणि रोमांचक आहे. 1901 मध्ये ते सुमारे 19,200 टन स्टील वापरून बनवले गेले. असे म्हटले जाते की दररोज सुमारे 85,000 लोक याचा वापर करतात.

Published On - 12:53 pm, Sun, 7 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI