तुम्ही 3D फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असाल, आता 3D रांगोळी पाहा! - if you have seen 3d photos or videos then see 3d rangoli - Latest News Events - TV9 Marathi

तुम्ही 3D फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असाल, आता 3D रांगोळी पाहा!

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

विरार : बालपणातील खेळ आणि मस्ती आजच्या डिजीटल युगात हरवत चालली आहेत. त्यांना उजाळा देण्यासाठी ‘षडांग क्लासेस’च्या कलाकारांनी  रांगोळी प्रदर्शनातून बालपणातील खेळाचे उत्कृष्ट रेखाटन केले आहे. त्यांच्या या कलाकृती पाहताना प्रत्येकजण आपल्या भूतकाळात नक्की डोकावेल आणि आपल्या त्या आठवणी क्षणभर जाग्या होतील यात काही शंका नाही.

आपण पाहात असलेले हुबेहूब दिसणारे चित्र हे पेंटिंग केलेले नाही तर रांगोळी कलाकारांच्या हस्तकलेतून साकारलेल्या या रांगोळ्या आहेत. आतापर्यंत तुम्ही 3डी फोटो- व्हिडीओ पाहिले असतील, पण कधी 3D रांगोळी पाहिली आहे का?, विरारमध्ये 3डी हटके रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारचे रंग एकत्र करून हुबेहूब रांगोळीतून  कलाकारांनी बालपण रेखाटले आहे.

आजच्या डिजिटल दुनियेत लहान मुलांमध्ये शारीरिक मेहनतीचे खेळच पूर्ण नष्ट झाले आहेत.

आजची मुलं ही मोबाईल, टीव्ही, टॅब यामध्येच गुरफटत जात आहेत.

आजही मुलांना खेड्यातील टायर, विटीदांडू, गोट्या, भोवरा, पाण्यातील कागदाची जहाज हे खेळ त्यांचे शारीरिक, बौद्धिक क्षमता वाढवणारे आहेत. मात्र ते आजच्या मुलांमधून हरवले आहेत.

भोवरा

लगोरी

गोट्या

More Photo Gallery