इनकम टॅक्स विभागाकडून तुम्हालाही आला का E-Mail? दुर्लक्ष केलं तर होईल नुकसान

अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांनी पुढे अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:59 PM, 28 Nov 2020
कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीमध्ये (Coronavirus Crisis) आयकर विभागाने (Income Tax Department) वेळीवेळी करदात्यांना (Taxpayers) ई-मेलद्वारे सूचना केल्या. जेणेकरुन करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा. पण तरीदेखील अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांनी पुढे अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे.
यामुळे आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे.
आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केल्याचं म्हटलं आहे.
self created ch1.36 लाख कोटी परतावा जारी केला - यासंबंधी विभागाने एक ट्विट केलं आहे. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा (IT Refund) दिला आहे. art, young man analyzing charts
हे आहेत IT विभागाचे अधिकृत आयडी - – @incometax.gov.in – @incometaxindiaefiling.gov.in – @tdscpc.gov.in – @cpc.gov.in – @insight.gov.in – @nsdl.co.in – @utiitsl.com
या ई-मेल आयडीद्वारे जर तुम्हाला मेल आला तरच त्यावर उत्तर द्या असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. तर हा ई-मेल पाठवणाऱ्या विभागांचे सेंडर आयडी खालीलप्रमाणे दिले आहेत.
– ITDEPT – ITDEFL – TDSCPC – CMCPCI – INSIGT – SBICMP – NSDLTN – NSDLDP – UTIPAN