हनिमूनला गेलेल्या खासदार संगमा पतीसोबत संसदेत, सुट्टी रद्द करण्यामागील कारण…..

नागरिकत्व संशोधन विधेयक बुधवारी संसदेत सादर करण्यात आलं. प्रचंड गदारोळात हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:39 AM, 5 Dec 2019
हनिमूनला गेलेल्या खासदार संगमा पतीसोबत संसदेत, सुट्टी रद्द करण्यामागील कारण.....
खासदार अगाथा संगमा यांचा गेल्या महिन्यात पॅट्रिक रोंग्मा मारक यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर खासदार संगमा पतीसोबत हनिमूनला गेल्या होत्या. मात्र सभागृहात हजर राहण्याचे आदेश मिळाल्यानंतर, खासदार संगमा यांनी पुढची सुट्टी रद्द करुन, त्या दिल्लीत परतल्या. संगमा पतीसोबत थेट संसदेत पोहोचल्या.