नोकरीच्या शोधात असाल तर महत्त्वाची बातमी, ‘या’ गोष्टी तुम्हाला करतील यशस्वी

कोट्यवधींची गुंतवणूक पुण्यात लवकरच येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळही लागणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:39 PM, 8 Mar 2021
1/8
कंपनीने 800 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कर्मचारी संघटना NITES ने कामगार आयुक्तांकडे याविरोधात तक्रार केली असून, कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
2/8
कोट्यवधींची गुंतवणूक पुण्यात लवकरच येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळही लागणार आहे.
3/8
विशेष म्हणजे इंजिनीअरिंगबरोबरच एमबीएचं शिक्षण घेतलेल्या पुण्यातील तरुणांनाही लवकरच चांगले दिवस येणार आहे.
4/8
ठाकरे सरकारचा 15 बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार - ठाकरे सरकारनं 2 नोव्हेंबर 2020 रोजी 15 बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला. महत्त्वाचे म्हणजे त्या कंपन्या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
5/8
अंदाजे 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक येणार असून, जवळपास 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडीमध्ये यातील 8 कंपन्या येणार आहेत.
6/8
पुण्यात उद्योगांसाठी पूरक कौशल्ये देणारी शिक्षण व्यवस्था - पुण्यात येणाऱ्या उद्योगांसाठी पूरक कौशल्ये देणार शिक्षण व्यवस्था पुण्यात असल्याचा फायदा उद्योगांना आणि रोजगारालाही होणार आहे.
7/8
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्यये असलेल्या इंजिनीअरिंगच्या 27 कॉलेजमधून दरवर्षी जवळपास 50 हजार विद्यार्थी बाहेर पडतात. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणाऱ्या सुमारे 40 संस्था पुण्यात असून, 14 विद्यापीठे आहेत.
8/8
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी काही बदल करावे लागू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.