आता डिक्कीमध्ये ठेवा दोन हेल्मेट , TVS ने लॉन्च केली नवी दमदार ज्यूपिटर 125 , जाणून घ्या फिचर्स

भारतात सुरुवातीपासूनच स्कूटर्सना चांगली पसंती मिळत आली आहे. अशातच TVS ने त्यांची नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. 2-व्हीलर TVS मोटर कंपनीने त्याच बहुचर्चित स्कूटर TVS ज्यूपिटरचे 125cc गुरुवारी लाँच केले आहे. चला तर जाणून घेऊयात tvs ज्यूपिटर125 चे फिचर्स.

1/4
TVS कंपनीने ज्यूपिटर 125 मध्ये पेट्रोलसाठी नविन पर्याय दिले आहेत. या आधी पेट्रोल भरण्याचा पर्याय गाडीच्या मागच्या बाजूस होता. परंतू आता या गाडीमध्ये पेट्रोल भरण्याचा पर्याय ठीक हँन्डलच्या  खालच्या बाजूस देण्यात आला आहे. कंपनीचे हे मॉडेल मॉडल ड्रम, ड्रम एलॉय आणि डिस्क व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

2/4
ज्यूपिटर 125 ला एक युनिक लूक देण्यासाठी कंपनीने मॉडेलला क्रोम टच दिला आहे. साईड मिररला जबदस्त असे दोन कलर देण्यात आले आहेत. साईड मिररमध्ये एलईडीचा वापर करण्यात आला आहे. ज्यूपिटर 125 ऑरेंज, सफेद, ग्रे , रंगामध्ये उपलब्ध आहे.

3/4
ज्यूपिटर 125ला  124.8 ccचे इंजिन देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये सिंगल सिलिंडर आणि 3 स्टेप अॅडजस्टेबल रियर शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.

4/4
ज्यूपिटर 125 ला 33 लिटरची डिक्की देण्यात आली आहे . यामध्ये तुम्ही 2 हेल्मेट आरामात ठेवू शकता. या गोष्टीमुळेच ही एक परफेक्ट 2 - व्हिलर आहे. ज्यूपिटर 125 ची शोरुममधील किंमत 73,400 रूपयांपासून सुरू होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI