Justin Beiber: जस्टीन बिबरचा लिपलॉक फोटो व्हायरल; पहा हेलीसोबतचे रोमँटिक फोटो

म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतलं आणि लोकप्रिय नाव म्हणजे जस्टीन बिबर. जस्टीन बिबर आणि त्याची पत्नी हेली बिबर हे सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात.

Aug 08, 2022 | 4:23 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 08, 2022 | 4:23 PM

म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतलं आणि लोकप्रिय नाव म्हणजे जस्टीन बिबर. जस्टीन बिबर आणि त्याची पत्नी हेली बिबर हे सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात. जस्टीन आणि हेली ही सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

1 / 7
हे दोघं सध्या नॉर्वेमध्ये आहेत. याठिकाणी रविवारी रात्री जस्टीनने परफॉर्म केलं. कॉन्सर्टच्या व्यग्र वेळापत्रकातून या दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढला असून नॉर्वेतील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जस्टीन आणि हेली बाहेर पडले.

2 / 7
जस्टीनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हेलीसोबतचे बरेच रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. या सर्व फोटोंपैकी जस्टीन आणि हेलीच्या लिपलॉकच्या फोटोने नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष वेधलं आहे.

3 / 7
'नॉर्वेतील काही क्षणचित्रे' असं कॅप्शन लिहित जस्टीनने हे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याचा ब्राऊन हुडी आणि पँट्स असा कूल लूक पहायला मिळतोय. त्यावर त्याने पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले आहेत. हिरव्या रंगाचा बेसबॉल कॅप त्या कूल लूकला अगदी साजेसा दिसतोय.

4 / 7
हेलीने तिला लूक अगदी साधा ठेवला आहे. राखाडी रंगाचा क्रॉप टॉप आणि गडद राखाडी रंगाचा पँट तिने परिधान केला आहे. जस्टीन सध्या वर्ल्ड टूर करत आहे. रामसे हंट सिंड्रोमचं निदान झाल्यानंतर 31 जुलैपासून त्याने पुन्हा परफॉर्म करण्यास सुरुवात केली आहे.

5 / 7
'लोलापलूझा' या सर्वांत मोठ्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये त्याने आधी परफॉर्म केलं. त्यानंतर रविवारी नॉर्वेमध्ये त्याच्या परफॉर्मन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर तो फिनलँड आणि हंगेरी याठिकाणी परफॉर्म करणार आहे. युरोप टूरनंतर तो दक्षिण आफ्रिकेकडे आपला मोर्चा वळवणार आहे.

6 / 7
विशेष म्हणजे जस्टीन बिबर भारतातही परफॉर्म करणार आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तो 18 ऑक्टोबर रोजी परफॉर्म करणार आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें