लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. देवाच्या दर्शनासाठी जोतिबा डोंगरांवर लाखो भाविकांनी हजेरी लावली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. जोतिबाच्या नावानं चांगभलं…. दख्खनचा राजा जोतिबा माझा म्हणतं देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या […]
जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेनं वाट पाहात असतात. मंदिर परिसरातला गुलाबीसागर मन प्रसन्न करतो.. सासनकाठी नाचवणाऱ्या पाहिलं तर लक्षात येतं की भक्तीचा किती मोठा सोहळा आहे. पायी येणाऱ्या सासनकाठ्या आधीच मंदिर परिसरात दाखल झाल्या आहेत. एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. देवाच्या दर्शनासाठी जोतिबा डोंगरांवर लाखो भाविकांनी हजेरी लावली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले.जोतिबाच्या नावानं चांगभलं…. दख्खनचा राजा जोतिबा माझा म्हणतं देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो.जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची भाविक आतुरतेनं वाट पाहात असतात. मंदिर परिसरातला गुलाबीसागर मन प्रसन्न करतो.. सासनकाठी नाचवणाऱ्या पाहिलं तर लक्षात येतं की भक्तीचा किती मोठा सोहळा आहे. पायी येणाऱ्या सासनकाठ्या आधीच मंदिर परिसरात दाखल झाल्या आहेत. एका खांद्यावर सासनकाठी घेऊन नाचणं हे भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते.जोतिबाच्या दोन यात्रांपैकी आजची यात्रा मुख्य असते.. दरवर्षी जोतिबाची पूजा वेगवेगळ्या रुपात मांडली जातेय. यंदाही जोतिबाची पूजा राजेशाही रुपात मांडली. जोतिबाचं हे रुप पाहण्यासाठी आणि जोतिबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची धडपड सुरु असते.कोल्हापूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढलाय. उन्हाच्या तडाख्याने पाय पोळतात पण त्याची कोणतीही तमा न बळगता भाविक डोंगरावर पोहोचले.जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांमध्ये महिला वर्ग देखील मागे नाही. त्यामुळं पोलिसांनी जोतिबा डोंगरावर चोख बंदोबस्त ठेवला. खूप लांबून भक्त डोंगरावर येत असल्यानं त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली गेली. मंदिराच्या प्रत्येक चौकटीवर आणि कळसावर गुलालाची उधळण पाहायला मिळत होती. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे.अशीच कृप दृष्टी भक्तांवर राहू दे असं भाविक साकडं घालून माघारी फिरले.