Immunity Booster : गुळवेलाचा काढा वाढवेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती, पाहा काढा बनविण्याची सोपी रेसिपी !

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशी आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:46 AM, 2 May 2021
1/5
health 1
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशी आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते.
2/5
healty food 2
गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. गुळवेलमुळे सांधेदुखी, त्वचेची अॅलर्जी, सर्दी आणि खोकला यासारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत होते.
3/5
healty food 3
गुळवेलचा काढा तयार करण्यासाठी आपल्याला 2 कप पाणी, गुळवेलच्या 2 लहान फांद्या, 2 दालचिनीच्या काड्या, 5 तुळशीची पाने, 8 पुदीनाची पाने, 2 चमचे मध, अर्धा चमचे हळद, 1 चमचे मिरपूड आणि आले आवश्यक आहे.
4/5
healty food 4
सर्व प्रथम, मध्यम आचेवर पॅनमध्ये 2 कप पाणी घाला. आता त्यात गुळवेल घाला. नंतर सर्व साहित्य घाला.
5/5
healty food 5
अर्धा तास हे पाणी उकळी येऊ द्या. उकळल्यानंतर हा काढा थंड करून चाळून घ्या. दररोज दिवसातून एकवेळा तयारी गुळवेलचा काढा घेतला पाहिजे.