चिंता वाढली! दक्षिण भारतात 15 पट अधिक संक्रामक नवा AP स्ट्रेन, महाराष्ट्रातही प्रभाव

भारतात कोरोना विषाणू संसर्गाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. त्या स्ट्रेनचं नाव एपी स्ट्रेन (AP Strain) आहे. corona virus new ap strain

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:29 PM, 4 May 2021
1/5
Corona AP strain
भारतात कोरोना विषाणू संसर्गाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. त्या स्ट्रेनचं नाव एपी स्ट्रेन (AP Strain) आहे. कोरोना विषाणूचं नवं वेरियंट आंध्रप्रदेशमध्ये समोर आलं आहे. वैज्ञानिक भाषेत N440K असं म्हटलं जातं. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी च्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा हा स्ट्रेन 15 पट अधिक घातक असल्याचं म्हटलं आहे.
2/5
Corona AP strain
पी स्ट्रेन (AP Strain)आंध्रप्रदेशमधील कुरनूल मध्ये समोर आला आहे. हा वेरियंट बी1. 617 आणि बी1.618 वेरियंटपेक्षा ताकदवर असल्याचं म्हटलं आहे. विशाखाटपट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे शास्त्रज्ञ या N440K वेरियंटचा अभ्यास करत आहेत. हा वेरियंट किती खतरनाक असेल हे सीसीएमबीचे शास्त्रज्ञ सांगू शकतील.
3/5
Corona AP strain
एपी स्ट्रेन (AP Strain) म्हणजेत N440K हे कोरोना विषाणू संसर्गाचं नव रुप वेगानं विकसित होत आहे. या वेरियंटची संसर्ग करण्याची आणि आजारी पाडण्याची क्षमता अधिक आहे. हा विषाणू वेगानं संसर्गित होत आहे आणि अधिक लोक संसर्गित करत आहे. या वेरियंटमुळे कोरोनाबाधित रुग्ण तीन ते चार दिवसात गंभीर परिस्थितीला पोहोचतो.
4/5
Corona AP strain
एपी स्ट्रेन (AP Strain)आंध्र प्रदेशमध्ये नागरिकांना वेगानं संसर्गित करत आहे. कोरोनाच्या नव्या वेरिंयटमुळं शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. याविषयी माहिती काढणं, संशोधन करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक झालं आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणाऱ्या व्यक्तींना देखील कोरोनाचा नवा वेरियंट संसर्गित करत आहे.
5/5
Corona AP strain
दक्षिण भारतात सध्या कोरोना विषाणूचे पाच वेरियंटचा संसर्ग झाला आहे. B.1, B.1.1.7, B.1.351, B.1.617 B.1.36* हे पाच स्ट्रेन दक्षिण भारतात सक्रिय आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणामध्ये हा एपी स्ट्रेन वेगानं पसरत आहे. महाराष्ट्रातही एपी स्ट्रेनचा परिणाम दिसून येत आहे.