Health Benefits : रोज सकाळी प्या मनुक्याचे पाणी, ‘या’ आजारांपासून रहाल कायम दूर !

मनुके खाणे जवळपास सर्वांनाच आवडतात. मनुक्याची चव अतिशय गोड असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:04 PM, 2 May 2021
1/5
food 5
मनुके खाणे जवळपास सर्वांनाच आवडतात. मनुक्याची चव अतिशय गोड असते. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात. मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय मनुक्याचे पाणी सेवन करणे देखील फायदेशीर आहे.
2/5
food 6
मनुक्यामध्ये फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि सोडियम यासारखे पोषक घटक असतात. मनुक्याचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला रात्री मनुके एक ग्लास गरम पाण्यात भिजवावे लागतील. दुसर्‍या दिवशी हे पाणी चाळून घ्या. ते हलके गरम करून रिकाम्या पोटी प्या. यामुळे बरेच रोग तुमच्यापासून दूर राहतील.
3/5
food 7
मनुका पाणी पिण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. हे पाणी पिल्यामुळे आपली किडनी चांगली राहते.
4/5
food 8
हृदयरोगाशी संबंधित समस्यांसाठी हे फायदेशीर आहे. हृदयविकाराचा झटका आणि बीपी यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे पाणी फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.
5/5
food 9
मनुक्याचे पाणी पिल्ल्यामुळे पल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. आपण दररोज हे पाणी पिऊ शकतो.