Marathi News » Photo gallery » Lifestyle photos » Maharashtra Mumbai Tourist destination for child and Parents sanjay gandhi national park Elephanta Cave Suraj water park Nehru Tarangan Red Carpet Wax Museum
मुंबईकरांनो, लहान मुलांना घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?, तर मग ‘या’ ठिकाणांना भेट द्याच!
उन्हाळा सुरू झालाय. अश्यात आता शाळांनाही लवकरच सुट्ट्या लागतील. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. लहान मुलांसाठी खास असलेल्या मुंबईतील पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला यात मिळेल आणि मुलांसोबत तुम्हीही सुट्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता...
एलिफंटा लेणी: जर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला इतिहासात रस असेल तर, एलिफंटा लेण्यांना नक्की भेट द्या.गेट वे ऑफ इंडियापासून बोटीने तुम्ही हा प्रवास करू शकता. शिवाय एलिफंटा लेण्यांकडे जाताना तुम्हाला गेट वे ऑफ इंडियाही पाहता येईल. सोबतच बोटींगचाही आनंद घेता येईल.
1 / 5
नेहरू तारांगण- तुमच्या मुलांना अंतराळात रस असेल तर नेहरू तारांगण तुमच्या मुलांचा आनंद द्विगुणित करू शकतं. इथं तुमच्या मुलांना चंद्र, तारे पाहता येतील. अंतराळात डोकावून पाहताना त्यांना ग्रहांचाही अभ्यास करता येईल.
2 / 5
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' हे ठिकाण केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आवडतं ठिकाण आहे. सगळ्यांनाच या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता असते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
3 / 5
सूरज वॉटर पार्क- नुकताच उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे मुलांना घेऊन वॉटर पार्कला जाणं तर बनता हैं बॉस... सूरज वॉटर पार्क हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. इथं वॉटर पार्क व्यतिरिक्त अनेक चांगल्या गोष्टी पहायला आणि खेळायला मिळतील.
4 / 5
रेड कार्पेट वॅक्स म्युझियम- मुंबई हे स्वप्नांचं शहर आणि या स्वप्नांच्या शहरात लहान मुलांची अनेक स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या ठिकाणी त्यांना आवडणाऱ्या आदर्शवत वाटणाऱ्या अनेक लोकांना भेटता येईल. जवळून पाहता येईल. कारण इथे मिस्टर बिनपासून एपीजे अब्दुल कलामांपर्यंत अनेकांचे मेणाचे पुतळे आहेत.