आज माघी गणेश जयंती आहे. त्यामुळं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तिकडे पुण्यातील दगडूशेठ गणपती दर्शनासाठीही मोठी रीघ लागली आहे.
मराठी महिन्यातील माघ महिन्याला सुरुवात झाली आहे. माघ महिन्याच्या चतुर्थीपासून माघ गणेशोत्सवाला सुरुवात होते. आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
बाप्पाच्या गाबाऱ्याला फुलाची आरास सजवण्यात आली आहे.
सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पहाटे 5 वाजता श्रींची मंगल आरती आणि प्रार्थना करण्यात आली. तर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत गणपती अथर्वषीर्ष सहस्त्रवर्तन महापूजा करण्यात आली.