Maharashtra School Reopen: ग्रामीण महाराष्ट्रात ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थी शाळेत दाखल, बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी केलं नवागतांचं स्वागत

राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार आज गोंदियातील ग्रामीण भागातील शाळा आज पासून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत.

1/9
 धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिली ते चौथी चे वर्ग तर शहरी भागात पहिली ते सातवी च्या वर्गाचे शाळा आजपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग तसेच मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवून वर्गात प्रवेश दिला गेला आहे. बरेच दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना पाहून चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या 1370 शाळा सुरू झाले आहे तर तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या 250 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यात ऐकून 2 लाख 2 हजार 565 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत.

2/9
 कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या 193 शाळा आज सुरू झाल्या 
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांंची शिक्षकांकडून थर्मामिटर पल्समीटर तपासणी करण्यात आली ,विद्यार्थ्यांनी शाळेत सामाजिक अंतरासह कोरोना प्रतिबंध नियम पाळत धडे गिरवले
कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या 193 शाळा आज सुरू झाल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांंची शिक्षकांकडून थर्मामिटर पल्समीटर तपासणी करण्यात आली ,विद्यार्थ्यांनी शाळेत सामाजिक अंतरासह कोरोना प्रतिबंध नियम पाळत धडे गिरवले
3/9
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळीतील एका शाळेत हजेरी लावून, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट पहायला मिळाला.

4/9
बीड तीन हजार शाळा आज प्रत्यक्षात खुल्या झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी परळी शहरातील गणेश पार भागात श्री वैजनाथ विद्यालय असणाऱ्या शाळेला पंकजा मुंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत केलं आहे.

5/9
 दोन वर्षानंतर शाळा उघडल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांचं ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात आलं.

6/9
जळगावमध्ये दोन वर्षांच्या काळानंतर शाळेत विद्यार्थ्यांसाठी आजचा पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा रांगोळी फुले तसेच फुग्यांनी सजविण्यात आलेला दिसतो. चोपडा तालुक्यातील पंकज प्राथमिक विद्यालयात सुद्धा शाळेच्या प्रवेशद्वारापासून तर वर्गापर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच प्रवेशद्वारावरच ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

7/9
अहमदनगरला आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या असून तब्ब्ल पावणेदोन वर्षानंतर पहिले ते चौथीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कोरोना विषाणूच्या भीतीनं शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नव्हते. तर अहमदनगरच्या फिरोदिया शाळेत मोठ्या उत्साहात मुलांच्या अंगावर फुले उधळून वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलेय. यावेळी हातावर सॅनिटायझर, तोंडावर मास्क घालून दक्षता घेण्यात येतेय. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

8/9
राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार आज गोंदियातील ग्रामीण भागातील शाळा आज पासून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले मुलांना चॉकलेटी देण्यात आले.

9/9
पंढरपूर तालुक्यात 360 प्राथमिक आणि माध्यमिक असे पहिली ते सातवी शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. पंढरपूर येथील द.ह. कवठेकर शाळे मध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आलेल्या विद्यार्थ्यांचे तापमान तसेच ऑक्सीमीटर ने ऑक्सिजन तपासून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला. यावेळी पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI