Navratri 2020 | नवरात्रीला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त

यंदा नवरात्र उत्सवाला थोडा उशीर होत आहे. येत्या 17 ऑक्टोबपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. (Navaratri Pooja Dasshera Devi Durga)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:00 PM, 12 Oct 2020
1/6
यावर्षी अधिक मास असल्यामुळे नवरात्र उत्सव उशिरा आला आहे. येत्या 17 ऑक्टोबपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत देवी दूर्गाच्या 9 रुपांना पूजलं जातं. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार यंदा 58 वर्षांनंतर यावर्षी अत्यंत शुभ मुहूर्त आला आहे.
2/6
यावर्षी 58 वर्षांनंतर शनी मकर राशीत असणार आहे. तर गुरु हा धनु राशीत असणार आहे. जोतिषांनुसार हा क्षण अनेकांना लाभदायक ठरणार आहे.
3/6
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पुजा केली जाते, सोबतच घटस्थापनासुद्धा करण्यात येते.
4/6
यावर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त शनिवारी, 17 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी आहे. काही कारणांमुळे तुम्ही या वेळेत पूजा करू न शकल्यास, त्याच दिवशी सकाळी 11 वाजून 02 मिनिटांपासून ते 11: 49 मिनिटांच्या कालावधीत तुम्ही पूजा करू शकता.
5/6
वास्तुशास्राप्रमाणे पूजास्थळ उत्तर- पूर्व दिशेला असायला पाहिजे. त्यामुळे घटस्थापना उत्तर- पूर्व दिशेला करा.
6/6
याच बरोबर यावर्षी नवरात्रीमध्ये अनेक चांगले योग येणार आहेत. जसे राजयोग, दिव्य पुष्कर योग, अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग.