Photo : न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज षटकार ठोकण्यात रोहित शर्मा, विराटच्याही पुढे, WTC अंतिम सामन्यात घमासान!

कसोटी क्रिकेटमध्ये सध्या खेळणाऱ्या सर्व दिग्गज फलंदाजापेक्षा अधिक षटकार हे एका गोलंदाजाने ठोकले आहेत. न्यूझीलंडचा हा गोलंदाज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपमध्ये देखील खेळणार आहे.

1/8
tim Southee Six
कसोटी क्रिकेट म्हणजे संयमाने खेळायचा खेळ. मात्र काही खेळाडू याला अपवाद असतात. ते कसोटीतही तुफान फलंदाजी करत षटकारांचा पाऊस पाडतात. यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्क्यूलम अव्वल स्थानी असला तरी सध्या खेळणाऱ्या दिग्गज फलंदाजाना न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने पछाडलं आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स पहिल्या क्रमांकावर असून टीम साऊदी देखील काही षटकरांच्या फरकानेच दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
2/8
ben stokes
इंग्लंडला विश्वचषक 2019 जिंकवून देण्यात महत्त्वाची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने सध्या खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 71 कसोटी सामन्यांत 130 डावांत 79 षटकार ठोकले आहेत.
3/8
tim southee
स्टोक्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी. टीमने 77 सामन्यांत 109 डावांत 73 षटकार उडवले आहेत. विराट, रोहित शर्मा, वॉर्नर यांसारख्या फलंदाजाना ही इतके षटकार मारता आलेले नाहीत.
4/8
angelo mathews
त्यानंतर नंबर येतो श्रीलंकेचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा. मॅथ्यूजने 90 कसोटी सामन्यांत 161 डावांत 63 षटकार ठोकले आहेत.
5/8
rohit
मॅथ्यूजनंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा येतो. शर्माने 38 कसोटी सामन्यांत 63 डावांत 59 षटकार लगावले आहेत. रोहित सर्वांत जलदगतीने 50 षटकार पूर्ण करणारा भारतीय आहे.
6/8
warner
रोहितनंतर सर्वाधिक षटकार मारलेत, ते ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने. त्याने 86 कसोटींत 159 डावांत 56 षटकार ठोकले आहेत.
7/8
ross
यानंतर नंबर लागतो, न्यूझीलंड संघाचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा. टेलरने 105 कसोटी सामन्यांत 183 डावांत 53 षटकार खेचले आहेत.
8/8
jadeja
दरम्यान सध्या खेळत असलेल्यांमध्ये 50 षटकार लगावणाऱ्यांमध्ये शेवटी नंबर लागतो भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाचा. जाडेजाने 51 कसोट्यांत 73 डावांत 60 षटकार ठोकले आहेत. विराटचा विचार करता त्याने 91 कसोटी सामन्यांत केवळ 22 षटकार लगावले आहेत.