PHOTO | आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं! सप्तपदी ते वरात… असा पार पडला श्वानांचा लग्न सोहळा

सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबीयांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून कुत्र्यांविषयी असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवलं.

| Updated on: Dec 26, 2020 | 5:40 PM
सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबीयांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून कुत्र्यांविषयी असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवलं. हा लग्न सोहळा शासनाच्या नियमानुसार पार पडला आहे. या लग्नसोहळ्यात नागरिक आणि गावकरी उत्साहानं सहभागी झाले होते.

1 / 5
या लग्नसोहळ्यात पन्नास नागरिक उपस्थित  होते. यावेळी शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे गगणे कुटुंबीयांनी पालन केले. या लग्नसोहळ्यात पाहुणे मंडळींसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

2 / 5
आपल्या घरातल्या, मित्रांच्या किंवा एकूणच माणसांच्या लग्नात जे-जे होतं, ते सगळं या कुत्रा-कुत्रीच्या लग्नात करण्यात आलं. अगदी, 'आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं...' अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रू नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळे काही सोपस्कार पार पाडण्यात आले. यातील विवाह सोहळ्यातील वराचे म्हणजेच कुत्र्याचे नाव टायगर आणि वधू म्हणजेच कुत्रीचे नाव डॉली असं आहे.

3 / 5
फुलांनी सजवलेल्या कारमधून डाँलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. या वरातीत  गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. यावेळी मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डाँलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. यावेळी टायगरदेखील रुबाबदार दिसत होता.

4 / 5
 मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत वधू निद्राधीन झाली होती. त्यामुळे त्यांनी डॉलीला उठवून टायगरच्या गाडीत बसवलं. तिला खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि एक आहेरही देण्यात दिला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात निघाली. दरम्यान, या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. गगणे कुटुंबाने दाखवलेल्या प्राणीप्रेमाबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात येत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.