सोनं खरेदीसाठी भारतात नंबर 1 ठरला हा अ‍ॅप, फेस्टिव्ह सिझनमध्ये 6 टक्के वाढला सेल

इतकंच नाही तर मागच्या 3 वर्षात देशभरातील वापरकर्त्यांना ऑनलाइन सोनं खरेदी करण्यास चालना देण्यासाठी सेफगोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपी सह भागीदारी केली. यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:06 PM, 23 Nov 2020
दिवाळीचा उत्सव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी झाली. यात भारतातील असा एक अॅप आहे ज्याच्या माध्यमातून भारतात सगळ्याच जास्त सोन्याची विक्री करण्यात आली आहे.
आघाडीचं डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 35 टक्के बाजारातील वाटा असलेले सोनं विकत घेणारा हा भारतातील सर्वात मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म ठरला आहे.
इतकंच नाही तर मागच्या 3 वर्षात देशभरातील वापरकर्त्यांना ऑनलाइन सोनं खरेदी करण्यास चालना देण्यासाठी सेफगोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपी सह भागीदारी केली. यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे.
PhonePe वर खरेदी केलं गेलेलं सोनं 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे. ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या बजेटनुसार, सोन्याची खरेदी-विक्री करू शकतात. एक रुपयांपासून सोन्याची खरेदी सुरू होते.
संपूर्ण भारतात 18,500 हून अधिक पिन कोड ग्राहकांनी फोनपेवर सोनं विकत घेतलं आहे.
आतापर्यंत छोट्या शहरांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी या अॅपच्या मदतीने सोनं खरेदी केली आहे.