आणि हर्षवर्धन जाधवांनी ‘गुढी’ उभारली !

पारंपरिक पद्धतीने गुढीचे पूजन करुन हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांनी गुढी उभारली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:51 AM, 13 Apr 2021
1/6
औरंगाबादमधील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जोडीदार ईशा झा यांचेही दर्शन झाले.
2/6
माझ्या जोडीदार आता इशा आहेत, असं वक्तव्य करत हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याची कूपी उलगडून दाखवली आहे.
3/6
पारंपरिक पद्धतीने गुढीचे पूजन करुन हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांनी गुढी उभारली. यानिमित्ताने जाधव आपल्या वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पटलांवर नवी गुढी उभारण्याचे संकेत देताना दिसले.
4/6
ईशा झा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती.
5/6
हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या आशीर्वादाने ईशा झा यांनी एका मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली होती. ईशा झा यांची ही एकप्रकारे राजकीय एन्ट्री मानली गेली.
6/6
"मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे" अशा शब्दात इशा झा हर्षवर्धन जाधवांचं कौतुक करतात.