PHOTO : बुचकळ्यात टाकणारा संभाजीराजेंचा फोटो, सत्य समजल्यावर छत्रपतींचा अभिमान वाटेल!

एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो (Chhtrapati Sambhajiraje taking rest in hut at Raigad).

| Updated on: May 10, 2021 | 6:29 PM
सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पाहून सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल. कदाचित तो फोटो तुम्हाला बुचकळ्यातही पाडेल. फोटोतील व्यक्ती संभाजीराजे तर नाहीत ना? असा विचार तुमच्या मनात येऊन जाईल. फोटो निरखून बघितल्यावर फोटोतील व्यक्ती नक्कीच संभाजीराजे हेच आहेत, या मतावर तुम्ही ठाम व्हाल. त्यानंतर संभाजीराजेंच्या या साधेपणाचा तुम्हाला अभिमान वाटेल. एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

1 / 4
संभाजीराजे आज (10 मे) सकाळी रायगडावर तेथील सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी गडावरील कामकाजांची पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद आहे. त्यामुळे संभाजीराजे पायऱ्या चढून त्यांनी सर्व कामांची पाहणी केली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करुन संभाजीराजे थकले. त्यांनी रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडावेळ आराम केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपून विश्रांती घेतली.

2 / 4
संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचे क्षण त्यांचे स्वीय साहाय्यक केदार योगेश यांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. "राजे हा फोटो लाखों लोकांच्या काळजाचा विषय झाला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा राजा माणूस. गडकोटांच्या रक्षणाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे राजे महाराष्ट्राने पाहिले. उन्हाच्या काहीलीमुळे थकून रायगडाच्या झोपडीच्या आश्रयाने थोडीशी विश्रांती घेताना पाहून राज्यातील जनता सुखावली", असं केदार योगेश म्हणाले.

3 / 4
संभाजीराजे यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर या दौऱ्याबाबत माहिती दिलीय. या माहितीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. "आज सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतो", असं संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले आहेत.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.