1/6

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली.
2/6

‘पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत. ’असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
3/6

चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ 1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.
4/6

‘मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील.’ असंही त्या म्हणाल्या.
5/6

‘मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे’ असं त्या टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाल्या.
6/6

यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या.