Maharashtra Day 2021 : राज्यात महाराष्ट्र दिनाची धूम, दिग्गज नेत्यांकडून ध्वजारोहण

(Maharashtra Day 2021: Flag hoisting by veteran leaders)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:38 PM, 1 May 2021
1/6
Maharashtra Day
आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
2/6
Maharashtra Day
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
3/6
Maharashtra Day
यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर हे देखील उपस्थित होते.
4/6
Maharashtra Day
कोरोना नियमांचं पालन करून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
5/6
Maharashtra Day
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे येथील विधानभवन आवारात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले.
6/6
Maharashtra Day
विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं.