Sanjay Rathod | मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला संजय राठोडांचाच हरताळ, पोहरादेवी गडावर प्रचंड गर्दी

Sanjay Rathod | शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:51 PM, 23 Feb 2021
1/7
Sanjay Rathod supporter mob 2
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 फेब्रुवारीला राज्यातील जनतेशी बोलताना कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचं पालन करा, असं आवाहन केले होते. शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे.
2/7
Sanjay Rathod supporter mob 2
संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. राठोडांचे हजारो समर्थक मंदिर परिसरात दाखल जाले आहेत. पोलिसांना न जुमानता समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. जिल्हा प्रशासनानं फक्त 50 जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती.
3/7
Sanjay Rathod supporter mob 2
पोहरादेवी गडावर वर्दळ वाढली, मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने लोकांचा ओघ सुरू, संजय राठोड यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक मंदिर प्रवेशद्वारावर दाखल झाले आहेत. समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज गर्दी वाढल्याने पोलीस ऍक्शन मोडवर आहेत.
4/7
Sanjay Rathod supporter mob 2
पोहरादेवी येथे करोनाची कोणतीही काळजी न घेता शक्तिप्रदर्शन सुरू आहे, मुख्यमंत्रांच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले जाते आहे, जिल्हा प्रशासन म्हणून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
5/7
Sanjay Rathod supporter mob 2
सकाळी 10 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शिवसेना नेत्यांनी सुमारे अर्धा पाऊण तास राठोड यांच्याशी चर्चा केली.
6/7
Sanjay Rathod supporter mob 2
राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे, तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार दिल्यानंतर यवतमाळमध्ये मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.
7/7
Sanjay Rathod supporter mob 2
संजय राठोड यांच्या ताफ्यात 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहनं, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे. संजय राठोड हे यवतमाळमधून आर्णीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांची आणखी एक गाडी त्यांच्या ताफ्यात दाखल झाली.